उल्हासनगर :- उल्हासनगर कँप ५ येथिल वाल्मिकनगर बॅ. . १७१९ या ठिकाणी असलेल्या एका नाल्याच्या काठावर सुरु असलेले अनधिकृत बांधकाम तोड सहाय्यक आयुक्तावर त्या अनधिकृत बांधकाम व्यवसायीकाने हल्ला करुन सहाय्यक आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्याना लोखंडी गेटच्या आत बंद केले तेव्हा सदर बांधकाम व्यवसायीक व त्याच्या मुलावर हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन अद्याप याना अटक केली नाही.
उल्हासनगर कँप ५ येथिल वाल्मिकनगर बॅ. नं. १७१९ जवळ असलेल्या नाल्याच्या काठावर बांधकाम व्यवसायीक सतपालसिंग चावला याने तीन हजार स्क्वेयर फुटाचे अनधिकृत बांधकाम सुरु केले होते. या बांधकामाची तक्रार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी याना मिळाली तेव्हा गणेश शिंपी व तुषार सोनवणे हे आपल्या अतिक्रमण विरोधी पथकासह त्या बांधकामावर कारवाई करन्या साठी गेले होते. दरम्यान हे पथक त्या ठिकाणी पोहचताच अनधिकृत बांधकाम व्यवसायीक सतपाल सिंग चावला याने आपल्या तीन मुलाच्या मदतीने सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यावर हल्ला करुन त्याना ठोशाबुक्यानी मारहाण केली तर सदर बांधकामाच्या कंपाऊंड मधील गेट बंद करुन शिंपी व त्यांच्या सहकाऱ्यांना कोंडुन ठेवले. आज याना सोडायचे नाही अशी धमकी दिली. तर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यानी गेट तोडुन बाहेर येवुन हिल लाईन पोलिस ठाणे गाठले व तुषार सोनवणे यानी सतपालसिंग चावला विरुध्द तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसानी सतपालसिंग चावला, करन सतपालसिंग चावला. हरसीमर सतपालसिंग चावला व अनमोल सतपालसिंग चावला यांच्या विरुध्द कलम ३५३ . ५०६ . व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या चार ही आरोपीना अद्याप अटक केली नाही.