कल्याण :- भारतीय डाक सेवेमध्ये महिलांचा लक्षणीय वाटा असून देशभरामध्ये संपूर्ण महिला पोस्ट कार्यालये सुरू होत आहेत. ठाणे विभागात दोन दोनशेहून अधिक महिला सेवा देत असून विभागातील पहिल्या संपर्ण महिला डाकघराचा मान कल्याणच्या सुभाष रोड पोस्ट कार्यालयास मिळाला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून या महिला डाकघराची सुरुवात शनिवारी विभागाच्या प्रवर अधीक्षक रेखा रिझवी यांच्या हस्ते झाली. यावेळी तीन महिन्यांच्या ध्रुवी मयूर शिंगरे या लहानगीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघड़न या उपक्रमाची सुरुवात झाली. भारतीय डाक विभागाने २०१३ मध्ये दिल्लीमध्ये पहिले महिला डाकघर सुरू केले. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील महानगरांमध्ये महिला डाकघर सुरू करण्यात आलेठाणे विभागामध्ये ८ मार्च २०२० जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील सुभाष रोड पोस्ट कार्यालयाचे रूपांतर महिला डाकघरामध्ये करण्यात आले. हे पोस्ट कार्यालय पूर्णपणे महिला चालवणार आहेत. या कार्यालयात ४ महिल कर्मचारी कार्यरत असून भारतीय डाक सेवेच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. सुकन्या समृद्धी योजना, सेव्हिंग बँक, आवर्ती खाते, मासिक आय योजना, ज्येष्ठ नागरिक खाते, पोस्टाचा नवीन उपक्रम इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सेवाही याठिकाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली. ठाणे विभागामध्ये २०० हून अधिक महिला कार्यरत असन या विभागातील महिलांची कामगिरीही चांगली आहे. अनेक महिलांना त्यांच्या कामाबद्दल विशेष सन्मानही मिळाले आहेत. तसेच महिला विशेष योजना सुरू होत असल्याने या डाकघराचा चांगला उपयोग ग्राहकांना होऊ शकेल, असा विश्वास येथील महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
कल्याणमध्ये संपूर्ण महिला पोस्ट!