बदलापूर :- अबरनाथ आणि कुळगाव बदलापूर त बदलापर । नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका . लवकरच होणार आहेत. १७ मे रोजी अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर पालिकांची मुदत संपत आहे. तीन महिन्यांपूर्वी राज्य शासन बदलल्यानंतर त्यांनी नगरपालिकांमध्ये बहुप्रभाग पद्धतीद्वारे होणारी नगरसेवकांची निवड आणि थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक रद्द केल्याने राज्य निवडणूक आयोगाने आपला जाहीर केलेला कार्यक्रम सतत दोन वेळा बदलला आहे. त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये बदल झाल्याने अद्यापही अंतिम वार्ड रचना व अंतिम आरक्षण प्रभाग निहाय जाहीर झालेले नाही. येत्या ११ मार्च रोजी हे अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहे. तर या महिन्याच्या शेवटी प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. राज्य शासन बदलल्यानंतर झालेल्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कायक्रम बदलला ह सर्व जाहार असल्यामुळे यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुका या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत घेण्यात येत होत्या. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत या निवडणुका न झाल्यास मतदानाच्या टक्केवारीवर त्यांचा प्रभाव पडू शकतो. कारण १ मे ते मे या दरम्यान बहुतांश शाळांचे रिझल्ट जाहीर होतात. त्यानंतर पालक हे आपल्या मुलांना घेऊन गावाला जातात त्यामुळे मतदार गावाला गेल्यानंतर त्याचा स्वाभाविक परिणाम हा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या साऱ्याचा विचार करून निवडणुका एप्रिल महिन्याच्या आतच घ्याव्यात अशी मागणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत.
एक मे पूर्वी निवडणुका होणे आवश्यक